छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुंबई येथील बॉम्बे जिमखाना येथे दि. १७व १८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रग्बी अजिंक्यपद स्पर्धे साठी जिल्ह्याचा १४ वर्षांखालील मुले, १४ वर्षांखालील मुली आणि वरिष्ठ महिला संघ जाहीर करण्यात आला आहे.
शहरातील पीईएस महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव श्याम अंभोरे आणि रियाजुद्दीन मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली निवड चाचणी घेण्यात आली. या निवड प्रक्रियेस ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
PESCITILEGE OF PHYSICAL EDUCATION
PAMBEDKAROPE
संघाचे प्रशिक्षक म्हणून सविता चौधरी काम पाहणार असून रामेशवर छायल हे संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर रग्बी असोसिएशनचे
अध्यक्ष रोहित देशपांडे, उपाध्यक्ष तथा उद्योजक अनुराग सावे, सहसचिव डॉ. केजल भारसाखळे आणि प्रवीण अग्रवाल यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













